stories

दोन सख्खे भाऊ असतात. एक दारुडा, गरीब, रोज बायकोला मारणारा. दुसरा खूप चांगला, पैसेवाला, समाजात मान असणारा. 

एक मित्र पहिल्याला विचारतो, ‘तू वाईट कसा झालास?’ तो सांगतो, ‘मी माझ्या वडिलांमुळे वाईट झालो.’ 

मित्र दुसऱ्याला विचारतो, ‘तू चांगला कसा झालास?’ तो सांगतो, ‘मी माझ्या वडिलांमुळे चांगला झालो.’ मित्राला आश्चर्य वाटते.

तो पुन्हा पहिल्याला विचारतो. पहिला म्हणतो, ‘माझे वडील दारुडे,वाईट होते. या गोष्टी लहानपणी पाहून मी तसाच झालो.’

मित्र दुसऱ्याला विचारतो. तो म्हणतो, ‘माझे वडील दारुडे,वाईट होते. या गोष्टी लहानपणी पहिल्या. मी ठरवले आपण असे वागायचे नाही. मी दारूपासून लांब राहिलो.’

यालाच सकारात्मक जीवन म्हणतात.

1 comment: